Search Results for: "Aajcha Sawal"

काँग्रेसच्या उमेदवारांची यादी निश्चित

February 21, 2014 8:32 PM6 comments
काँग्रेसच्या उमेदवारांची यादी निश्चित

21 फेब्रुवारी : लोकसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपली आहे. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसने यादी निश्चित केल्यानंतर काँग्रेसनेही आपली यादी तयार केलीय. काँग्रेसच्या देशपातळीवरच्या पहिल्या यादीत महाराष्ट्रातली काही नावं जाहीर होण्याची शक्यता आहे. काही अपवाद वगळता अनेक जागांच्या उमेदवारांची नावं जवळपास निश्चित करण्यात आली आहे. आयबीएन-लोकमतच्या हाती काँग्रेस उमेदवारांची यादी लागलीय. या [...]

Read more ›

मतदानपूर्व जनमत चाचणीवर निर्बंध आणा – काँग्रेस

November 3, 2013 3:32 PM1 comment
मतदानपूर्व जनमत चाचणीवर निर्बंध आणा – काँग्रेस

3 नोव्हेंबर : २०१४ च्या निवडणुकीमध्ये  काँग्रेसच्या जागा कमी होतील असे भाकीत  मतदानपूर्व जनमत चाचणीत (ओपिनियन पोल) वर्तवले जात असल्याने बिथरलेल्या काँग्रेसने ओपिनियन पोलवर निर्बंध आणा अशी मागणी निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे केली आहे.   २०१४ च्या लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून काँग्रेस व भाजप दोन्ही पक्षांनी एकमेकांवर कुरघोडी करण्याची [...]

Read more ›

नरेंद्र मोदींचं आक्रमक ब्रँड बिल्डिंग यशस्वी ठरेल का ?

April 11, 2013 3:40 PM0 comments
नरेंद्र मोदींचं आक्रमक ब्रँड बिल्डिंग यशस्वी ठरेल का ?

10 एप्रिलनरेंद्र मोदींचं आक्रमक ब्रँड बिल्डिंग यशस्वी ठरेल का ? असा आजचा सवाल होता. पत्रकार जतीन देसाई, भाजपचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य विनय सहस्त्रबुद्धे, बंडखोर काँग्रेस नेते अजित सावंत, पत्रकार निळू दामले, राजकीय विश्लेषक डॉ. सुहास पळशीकर सहभागी होते.

Read more ›

आ.क्षितिज ठाकूर, राम कदमांना न्यायालयीन कोठडी

March 22, 2013 10:41 AM0 comments
आ.क्षितिज ठाकूर, राम कदमांना  न्यायालयीन कोठडी

22 मार्चमुंबई : पीएसआय सचिन सूर्यवंशी यांना मारहाण प्रकरणाची बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितिज ठाकूर आणि मनसेचे आमदार राम कदम यांना 14 दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आज दोन्ही आमदारांना किला कोर्टात हजर करण्यात आले. गुरूवारी दोन्ही आमदार पोलिसांना शरण आले होते. त्यानंतर त्यांना अटक करून किला कोर्टात हजर केले असता कोर्टाने एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. आता आमदारांच्या अडचणीत आणखी भर पडली. 5 एप्रिल पर्यंत आमदारांना न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. विधिमंडळाच्या प्रांगणात आमदार क्षितिज ठाकूर, राम कदम यांच्या इतर तीन आमदारांनी पीएसआय सूर्यवंशी यांना बेदम मारहाण केली होती. या प्रकरणी पाचही आमदारांचे 9 महिन्यासाठी निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्या जामीन अर्जांवर सोमवारी सुनावणी होणार आहे. त्यामुळे त्यांना सोमवारपर्यंत न्यायालयीन कोठडीत राहावं लागणार आहे.

Read more ›

राडेबाज आमदारांवर झालेली कारवाई पुरेशी आहे का ?

March 21, 2013 5:31 PM0 comments
राडेबाज आमदारांवर झालेली कारवाई पुरेशी आहे का ?

20 मार्चराडेबाज आमदारांवर झालेली कारवाई पुरेशी आहे का ? असा आजचा सवाल होता.काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत, वसई जन आंदोलन समिती आमदार विवेक पंडित, भाजपचे आमदार नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक, माजी पोलीस अधिकारी जयंत उमराणीकर, सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी,लोकमतचे कार्यकारी संपादक संजीव उन्हाळे सहभागी होते.

Read more ›

‘बालक पालक’च्या निमित्ताने लैंगिक शिक्षणाचा मुद्दा अजेंड्यावर आलाय का ?

January 12, 2013 1:54 PM0 comments
‘बालक पालक’च्या निमित्ताने लैंगिक शिक्षणाचा मुद्दा अजेंड्यावर आलाय का ?

11 जानेवारी 13'बालक पालक'च्या निमित्ताने लैंगिक शिक्षणाचा मुद्दा अजेंड्यावर आलाय का ? असा आजचा सवाल होता.'बालक पालक' चे दिग्दर्शक रवी जाधव, बालक पालक लेखक, अंबर हडप, मानसोपचार तज्ज्ञ अनुराधा सोवनी, परिवर्तनचे ़ट्रस्टी हमीद दाभोलकर, लैंगिक शिक्षण प्रशिक्षक सुलभा शेरताटे, विद्यार्थिनी मुक्ता खरे,विधान परिषद विरोधी पक्षनेते, विनोद तावडे सहभागी झाले होते.

Read more ›

127 वर्षांच्या काँग्रेस पक्षानं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे ?

December 29, 2012 5:24 PM0 comments
127 वर्षांच्या काँग्रेस पक्षानं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे ?

28 डिसेंबर127 वर्षांच्या काँग्रेस पक्षानं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे ? असा आजचा सवाल होता.काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई, शिवसेनेचे खासदार भारतकुमार राऊत, जेष्ठ संघ स्वयंसेवक मधू देवळेकर,लोकमतचे संपादक अनंत दीक्षित, कम्युनिस्ट नेते अजित अभ्यंकर सहभागी झाले होते.

Read more ›

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाबाबत सुरू असलेली श्रेयाची लढाई दुर्देवी आहे का ?

December 7, 2012 4:51 PM0 comments
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाबाबत सुरू असलेली श्रेयाची लढाई दुर्देवी आहे का ?

05 डिसेंबरडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाबाबत सुरू असलेली श्रेयाची लढाई दुर्देवी आहे का ? असा आजचा सवाल होता.काँग्रेसचे खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर, रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर,प्रदेश काँग्रेसचे माजी चिटणीस महेंद्र साळवे, आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले,भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, आंबेडकरी साहित्याचे संपादक हरी नरके सहभागी झाले होते.

Read more ›

अफवांवर विश्वास ठेवू नका,परिस्थिती नियंत्रणात – गृहमंत्री

August 11, 2012 1:08 PM0 comments
अफवांवर विश्वास ठेवू नका,परिस्थिती नियंत्रणात – गृहमंत्री

11 ऑगस्टसीएसटीची परिस्थिती नियंत्रणात आली आहे पण कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, एसएमएस, सोशल माध्यम फेसबुक, ट्विटरच्या कोणत्याही माहितीवर विश्वास ठेवू नका असं आवाहन राज्याचे गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी केलं आहे. तसेच रमजान ईद जवळ आली आहे. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका झालेली घटनाही निषेधार्थ आहे त्याची कसून चौकशी केली जाईल असंही आर.आर.पाटील यांनी स्पष्ट केलं. आज दुपारी 2:30 च्या सुमाराला सीएसटी परिसरात निघालेल्या मोर्चाला हिंसक वळण लागले आणि जमावाने वाहनांची तोडफोड करत पेटवून दिले. आबांनी आपला सांगलीचा दौरा अर्धवट सोडून मुंबईकडे निघाले आहे. घटनास्थळी अरूप पटनाईक आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती पूर्ण नियंत्रणात आली आहे. घटनेची माहिती वार्‍यासारखी पसरली. घटनास्थळी मंत्री, आमदार, नगरसेवकांनी धाव घेऊन लोकांना शांत राहण्याचे आवाहन केलंय. एस.एम.एस आणि फेसबुकवरून खोटी माहिती पसरवली जातेय. अफवा पसरविणार्‍यांवर कारवाई करा अशी मागणी आमदार नवाब मलिक त्यांनी केली आहे. संबंधित बातम्यासीएसटी परिसरात तोडफोड,जाळपोळ (व्हिडिओ) आसाम पाचव्या दिवशीही धुमसतंय, 44 जणांचा मृत्यू (आजचा सवाल) आसाममधील हिंसाचार रोखण्यात गोगोई सरकारनं चालढकल केली आहे का?

Read more ›

सीएसटी परिसरात हिंसाचारामध्ये 2 ठार

11:02 AM0 comments
सीएसटी परिसरात हिंसाचारामध्ये 2 ठार

11 ऑगस्टमुंबईतील मुख्य रेल्वे स्थानक छत्रपती शिवाजी टर्मिनल (सीएसटी) परिसरात आसाममध्ये झालेल्या दंगलीच्या विरोधात काढण्यात आलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागले. जमावाने तुफान दगडफेक करत वाहनाची तोडफोड,जाळपोळ केली या घटनेत 2 जण ठार झाले असून 10 जण जखमी झाले आहे. या दगडफेकीत 12 पोलीस किरकोळ जखमी झाले आहे. जखमींवर नजीकच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. आता परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आली आहे.आज दुपारी 2:30 च्या सुमाराला सीएसटी परिसरात आसाममध्ये झालेल्या दंगलीचा विरोध करण्यासाठी रजा अकादमी संघटनेच्या वतीने हा निषेध मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा आझाद मैदानाकडे निघाला होता. पण या मोर्च्यातील जमाव आक्रमक होत जोरदार दगडफेक केली, वाहनाची तोडफोड सुरु केली. पोलिसांच्या आणि बेस्टच्या बसेसला आग लावण्यात आली. तीन चॅनेलच्या ओबी व्हॅनला पेटवून देण्यात आले. पोलिसांनी जमावाला आवर घालण्याच प्रयत्न केला असता जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. पोलिसांच्या वाहनांची तोडफोड करुन आग लावण्यात आली. जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडण्यात आल्या असून हवेत गोळीबारही करावा लागला. पोलिसांनी घटनास्थळाचा ताबा घेतला आहे. परिस्थिती नियंत्रणात असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका,शांतता राखा असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. या तोडफोडीचा लोकलवर परिणाम झाला नाही याबद्दल रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे सुरुळीत सुरु असल्याचं सांगण्यात येतं आहे. गृहमंत्री आर.आर. पाटील आपला सांगलीवरचा दौरा अर्धवट सोडून मुंबईकडे निघाले आहे. परिस्थिती नियंत्रणात आली असून ज्या जमावाने तोडफोड केली. त्यांचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, भाजपाचं शिष्टमंडळ रविवारी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. घटनेच्या चौकशीसाठी सर्वपक्षीय समिती नेमावी अशी त्यांची मागणी आहे. त्याचबरोबर पत्रकारांना 100 टक्के नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुणगंटीवार यांनी केली आहे. तोडफोडीत नुकसान- 10 बेस्ट बसेसची तोडफोड- 3 न्यूज चॅनेलच्या 'ओबी व्हॅन'(आऊट डोअर ब्रॉडकास्टिंग व्हॅन)ची तोडफोड, व्हॅनला लावली आग- पोलिसांच्या गाड्याची तोडफोड, मोठी व्हॅन पेटवली- स्टेशनच्या बाहेरील वाहनांची तोडफोड, अनेक गाड्यांची तोडफोड या तोडफोडीचा लोकलवर परिणाम झाला नाही याबद्दल रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे सुरुळीत सुरु असल्याचं सांगण्यात येतं आहे. गृहमंत्री आर.आर. पाटील आपला सांगलीवरचा दौरा अर्धवट सोडून मुंबईकडे निघाले आहे. परिस्थिती नियंत्रणात आली असून ज्या जमावाने तोडफोड केली. त्यांचा शोध घेतला जात आहे.संबंधित बातम्यासीएसटी परिसरात तोडफोड,जाळपोळ (व्हिडिओ) आसाम पाचव्या दिवशीही धुमसतंय, 44 जणांचा मृत्यू (आजचा सवाल) आसाममधील हिंसाचार रोखण्यात गोगोई सरकारनं चालढकल केली आहे का?

Read more ›

टँकरमुक्त महाराष्ट्राचं स्वप्न हवेत विरलंय का ?

May 5, 2012 5:04 PM0 comments
टँकरमुक्त महाराष्ट्राचं स्वप्न हवेत विरलंय का ?

04 मेटँकरमुक्त महाराष्ट्राचं स्वप्न हवेत विरलंय का ? असा आजचा सवाल होता.शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे, याचिकाकर्ते मच्छिंद्र पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र डोखळे, विधान परिषद विरोधी पक्षनेते विनोद तावडे,शेतकरी गुलाबराव डेरे सहभागी झाले होते. आजचा सवाल पाहण्यासाठी व्हिडिओ आयकॉनवर क्लिक करा

Read more ›

मुंबईत परमिट पद्धत लागू करण्याची राज ठाकरे यांची मागणी योग्य आहे का ?

July 19, 2011 6:32 PM0 comments
मुंबईत परमिट पद्धत लागू करण्याची राज ठाकरे यांची मागणी योग्य आहे का ?

19 जुलैमुंबईत परमिट पद्धत लागू करण्याची राज ठाकरे यांची मागणी योग्य आहे का ? असा आजचा चर्चेचा विषय होता.ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ,काँग्रेस नेते जनार्दन चांदूरकर,मनसे गटनेते बाळा नांदगावकर, माजी महापालिका उपाआयुक्त गो. रा. खैरनार सहभागी झाले होते.

Read more ›

बाळासाहेब ठाकरे आणि दिग्विजय सिंहांनी अण्णा हजारेंवर केलेली टीका योग्य आहे ?

June 23, 2011 6:29 PM0 comments
बाळासाहेब ठाकरे आणि दिग्विजय सिंहांनी अण्णा हजारेंवर केलेली टीका योग्य आहे ?

23 जूनबाळासाहेब ठाकरे आणि दिग्विजय सिंहांनी अण्णा हजारेंवर केलेली टीका योग्य आहे ? असा आजचा चर्चेचा विषय होता.ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस ऍड. महादेव शेलार,शिवसेनेचे उपनेते अरविंद सावंत, लोकमत विकास संपादक अनंत दीक्षितसामाजिक कार्यकर्त्या सुनिता सु.र. सहभागी झाले होते.

Read more ›