नागपुरात 9,705 पाक नागरिकांचा अवैध मुक्काम

September 5, 2013 9:48 PM0 commentsViews: 1057

nagpur pak nagrik05 सप्टेंबर : नागपुरात जवळपास पावणे दहा हजार पाकिस्तानी नागरिक अवैधरित्या राहत असल्याची धक्कादायक माहिती माहितीच्या अधिकारात उघड झालीय. 1995 नंतर प्रवासी व्हिसावर भारतात आलेल्या आणि व्हिसा संपूनही पाकिस्तान परत न गेलेले 9,705 पाकिस्तानी नागरिक  वास्तव्य करून आहेत. याबाबत आता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आलीय.

 

नागपुरातील जरिपटका भागात हे पाकिस्तानी नागरिक राहत आहेत. यात हिंदू, मुस्लीम, शीख आणि बौद्ध अशा सर्वच धर्माचे लोक आहेत. यावर हायकोर्टाने केंद्रीय गृहमंत्रालयाचे सचिव आणि विदेश मंत्रालयाचे सचिव आणि नागपूर पोलीस यांना नोटीस बजावली आहे. व्हिसा संपलेला असतांना देशात अवैधपणे राहत असलेल्या पाकिस्तानी नागरिकांसदर्भात याचिकाकर्त्यांनी माहितीच्या अधिकारात माहिती मागवली होती.

 

यासंदर्भात पाकिस्तानातील भारताच्या उच्चायुक्तांकडूनही माहिती मागवण्यात आली होती. नागपूरच्या जरिपटका भागात अनेक पाकिस्तानचे नागरिक राहत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या लोकांनी मोठमोठ्या प्रॉपर्टीजही खरेदी केल्या आहेत. पण, पोलिसांनी याप्रकरणी आतापर्यंत कुठलीच कारवाई केलेली नाही.

close