रुपयासाठी बाप्पा आले धावून, ‘सिद्धीविनायक’ देणार सोनं!

September 5, 2013 9:04 PM2 commentsViews: 1635

sidhivinayak bapa05 सप्टेंबर : डॉलरच्या तुलनेच रूपयाची झालेली घसरण रोखण्यासाठी देशातील मंदिरांनी आपलं सोनं सरकारकडे द्यावं, अस आवाहनं पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी केलं होतं. याला मुंबईतल्या सिध्दीविनायक ट्रस्टनं सकारात्मक प्रतिसाद दिलाय. देशाच्या हितासाठी सोनं देण्याची तयारी असल्याचं सिध्दीविनायक ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष मयेकर यांनी सांगितलंय.

डॉलरच्या तुलनेच रूपयाची झालेली ऐतिहासिक घसरण रोखण्यासाठी आता केंद्र सरकारने मंदिरात धाव घेतली. आणि देव बाप्पाला अर्पण करण्यात आलेलं सोनं रूपयाला वाचवण्यासाठी देण्यात यावं अशी मागणी केलीय. डॉलरच्या तुलनेत घसरत्या रुपया आणि एकूणच बिकट अर्थव्यवस्थेवर उपाय म्हणून देशातल्या मंदिरांनी आपलं सोनं सरकारकडे द्यावं, अस आवाहनं पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी केलं होतं. रूपयाची अवस्था पाहत सिद्धीविनायक ट्रस्टने पुढाकार घेतलाय.

 

जर देशाचं हित होत असेल तर आम्ही आमचं सोनं सरकारकडे द्यायला तयार आहोत, असं सिध्दीविनायक ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष मयेकर यांनी सांगितलंय. यापूर्वीही ट्रस्टनं मंदिराकडचं दहा किलो सोनं स्टेट बँक ऑफ इंडियाकडे ठेवलं आहे. त्यातून मिळणार्‍या व्याजातून अनेक सामाजिक कार्य केली जातात. यापुढे सामाजिक कार्यासाठी सरकारला सोनं हवं असेल तर आम्ही नक्की पुढाकार घेऊ, असंही मयेकर यांनी सांगितलंय. केंद्र सरकार रुपयाला सावरण्यासाठी सोनं गहाण ठेवण्याचा अखेरचा पर्याय आहे यासाठी ही मागणी केल्याचं सांगण्यात येत आहे.

  • Prathamesh

    kay Devu naka tya Sarkarla , kahihi nahi honar, ulat aple Sone Lubadayla Baslet he

  • Jayesh

    Swiss bank money baddal kay jhala? To paisa ka nokoya government la?

close