मोहम्मद आसिफवर आयपीएलची एक वर्ष बंदी

January 30, 2009 10:53 AM0 commentsViews: 1

30 जानेवारीपाकिस्तानचा फास्ट बॉलर मोहमद आसिफवर आयपीएल च्या समितीने एक वर्षाची बंदी ठोठावली आहे. सप्टेंबर 2008 पासून ही शिक्षा लागू झाली आहे. गेल्या शनिवारी आसिफची सुनावणी आयपीएल ट्रीब्युनल समोर झाली होती. पण ट्रिब्युनलने आपला अंतिम निर्णय राखून ठेवला होता. सुनील गावसकर, डॉक्टर रवी बापट आणि ऍडव्होकेट शिरिष गुप्ते यांच्या पॅनलने आसिफची चौकशी केली होती. आसिफवर आयपीएल स्पर्धेदरम्यान उत्तेजक द्रव्य घेतल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. दिल्ली डेअर डेव्हिल्स टीममधून आसिफची यापूर्वीच हकालपट्टी झालीय. आसिफ या शिक्षेविरूद्ध आयसीसीच्या ट्रिब्युनलकडे अपील करू शकतो. आता तो ही अपील करणार का याकडे सगळ्यांच लक्ष आहे.

close