‘गोल्डन गर्ल’ अंजन ठमकेंचा गौरव

September 5, 2013 10:13 PM0 commentsViews: 145

05 सप्टेंबर : युवा आशियाई स्पर्धेत भारताला गोल्ड मेडल मिळवून देणार्‍या अंजना ठमकेला महाराष्ट्र सरकारच्यावतीनं 11 लाख रुपयांचं पारितोषिक देण्यात आलं. नाशिकमध्ये हा गौरव सोहळा रंगला. यावेळी अंजनाच्या पालकांचाही सत्कार करण्यात आला. तसंच भुजबळ फाउंडेशनच्या वतीनं अंजनाचे प्रशिक्षक विरेंद्र सिंह यांना 1 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं. यावेळी राज्याचे आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड, सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ, माजीमंत्री वसंत पुरके उपस्थित होते.

close