ताईत देण्याचं आमिष देऊन तरूणीवर बलात्कार

September 5, 2013 10:57 PM0 commentsViews: 732

Image img_237192_nagpurrapecase34_240x180.jpg05 सप्टेंबर : अंधश्रध्देतून ठाण्यात एका तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघड झालीय. इच्छापूर्तीचा ताईत बनवून देतो असं सांगत एका तरुणानं पुण्यातल्या तरुणीवर बलात्कार केलाय.

 

विशेष म्हणजे ही तरुणी उच्चशिक्षित आहे. याप्रकरणी नदीम शेख या 21 वर्षांच्या तरुणाला अटक करण्यता आलीय. अभ्यासात लक्ष लागण्यासाठी आणि सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी मौलवीकडे नेतो असं या आरोपीनं सांगितलं.

 

पण, मौलवीकडे न नेता तिला गुंगीचं औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला. तीचे विवस्त्र फोटो काढलेत. हा प्रकार मोबाईल दुकानात कामाला असणार्‍या मुलाच्या लक्षात आल्यानं उघड झालाय.

close