महावितरणचा ग्राहकांना दरवाढीचा शॉक

September 6, 2013 2:46 PM0 commentsViews: 242

Image img_226072_electrisity4_240x180.jpg06 सप्टेंबर : ऐन सणासुदीच्या तोंडावर वीज नियामक आयोगाने महावितरणचा ग्राहकांना दरवाढीचा शॉक दिलाय. वीजनिर्मिती प्रकल्पांसाठी झालेला अतिरिक्त खर्च ग्राहकांकडून वसूल करण्याला आयोगानं मंजुरी दिलीय. यामुळे तब्बल दोन कोटी ग्राहकांना आता प्रतियुनिट 80 ते 90 पैसे ज्यादा मोजावे लागणार आहेत.

 

आयोगानं एकूण 3 हजार 668 कोटी रूपयांची दरवाढ सुचवलीय. त्यात महावितरणनं अंतरीम वाढ मागितली होती. महानिर्मिती आणि महापारेषण या दोन कंपन्यांच्या माध्यमातून 2010 या वर्षापासून राज्यातल्या वीज प्रकल्पांची कामं करण्यात आली होती. त्याचाच परिणाम दरवाढीवर झालाय.

 

पारस, परळी आणि खापरखेडा या प्रकल्पांमध्ये संचांची उभारणी करताना जो खर्च झाला त्याच्या वसुलीसाठी महानिर्मितीनं आयोगाचे दरवाजे ठोठावले होते. महावितरणच्या मागणीचा विचार झाला असून आयोगानं 3 हजार 686 कोटी रूपयांच्या खर्चाला मंजुरी दिली. हे सर्व पैसे इंधन समायोजन आकार म्हणून वसूल केले जाणार आहेत. महावितरणला हे सर्व पैसे वसूल करून थकबाकीपोटी महानिर्मिती आणि महापारेषणला द्यावे लागणार आहेत.

close