मनोहर पर्रिकरांचं घूमजाव,’मोदी तर उत्तम प्रशासक’

September 6, 2013 3:34 PM0 commentsViews: 396

parrikar06 सप्टेंबर : गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी घूमजाव केलंय. मोदी हे उत्तम प्रशासक असून त्यांना जनतेनं अगोदरच पंतप्रधान म्हणून घोषित केलंय. माध्यमांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला असं सांगत पर्रिकर यांनी माध्यमांवर खापर फोडलं.

 

मनोहर पर्रिकर यांनी दोन महिन्यापूर्वी न्यूयॉर्क टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत थेट नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता. गुजरात दंगल थांबवता आली असती पण तसे होऊ शकले नाही. ही दंगल नरेंद्र मोदींच्या कारर्किदीवर काळा डाग आहे असं खुलासा पर्रिकर यांनी केला होता. पर्रिकर यांच्या विधानामुळे भाजपच्या गोटात एकच खळबळ उडाली.

 

पर्रिकर हे नरेंद्र मोदींची समर्थक मानले जातात. त्यांनी असं विधान केल्यामुळे आश्चर्य व्यक्त होतं आहे. आपल्या विधानामुळे गोंधळ उडाला हे लक्षात आल्यानंतर पर्रिकर यांनी सारवासारव केली. आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला असं सांगत खापर माध्यमांवर फोडलं. दंगलींदरम्यान, मोदी प्रशासन अपयशी ठरल्याचं आपण आधीही म्हटलं होतं. मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्याचा निर्णय केंद्रीय पातळीवर होईल, असंही ते म्हणाले.

close