चीनने भारताची जमीन बळकावली नाही -अँटनी

September 6, 2013 3:49 PM0 commentsViews: 328

a k antoney06 सप्टेंबर : चीननं भारतीय हद्दीत 640 चौरस किलोमीटर भूभाग बळकावल्याच्या आरोपाचे संसदेत आज पडसाद उमटले. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार श्याम सरण यांनी आपल्या अहवालात चीननं भारताचा भूभाग बळकावल्याचा कोणताही उल्लेख केला नसल्याचं संरक्षणमंत्री ए.के.अँटनी यांनी स्पष्ट केलं. तसंच देशाचं रक्षण करण्यास सरकार समर्थ असल्याचही अँटनी यांनी म्हटलंय. विरोधकांनी केलेल्या आग्रही मागणीनंतर ए. के. अँटनी यांनी लोकसभेत निवेदन सादर केलं.

 

सियाचीन आणि लडाखमध्ये चीननं भारतीय हद्दीत मोठ्या प्रमाणावर घुसखोरी केल्याचं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाच्या अहवालात नमूद करण्यात आलंय. चीननं भारताचा 640 चौरस किलोमीटरचा भूभाग बळकावलाय. इतकंच नाही, तर चीनचे सैनिक भारतीय सैन्याला प्रत्यक्ष ताबारेषेवर गस्तही घालू देत नाहीयेत असं या अहवालात म्हटलाच्या दावा करण्यात येत होता. हा अहवाल पंतप्रधान कार्यालयाला सादर करण्यात आलाय.

 

चीनच्या घुसखोरीचा तपास लावण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार श्याम सरन यांच्या नेतृत्वाखाली सत्यशोधन समिती स्थापन करण्यात आली होती. त्यांनी मात्र, असा काही अहवाल सादर केल्याचं नाकारलंय. या प्रकरणी संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांनी संसदेत निवेदन करावं अशी मागणी भाजप नेते यशवंत सिन्हा यांनी केली होती.

close