बाळासाहेबांचं स्मारक रखडण्याची शक्यता

September 6, 2013 3:37 PM0 commentsViews: 382

Image img_228142_balasahebsmarak3563_240x180.jpg06 सप्टेंबर :शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं महापौर बंगल्याशेजारी पार्क क्लबवर प्रस्तावित स्मारक आणि शिवाजी पार्क मैदानावर नियोजित चौथरा आता रखडण्याची शक्यता आहे. आणि यावेळी कारण पुढे आलं आहे नवी विकास नियमावली.

14 ऑगस्ट 2013 च्या महापालिकेच्या परिपत्रकानुसार शिवाजी पार्क परिसर हा नव्या विकास नियमावलीनुसार हेरिटेज परिसर म्हणून घोषित करण्यात आलाय. या परिसरात नवं बांधकाम किंवा दुरूस्तीसाठी हेरिटेज समितीची एनओसी मिळवणं गरजेचं असणार आहे.

यामुळे आता जरी बाळासाहेबांच्या स्मारकाला पालिकेनं हिरवा कंदील दाखवला असला तरी स्मारकासाठी आता नव्यानं हेरिटेज समिची परवानगी घ्यावी लागणार आहे. याबरोब महापौर बंगल्याशेजारी असलेल्या पार्क क्लब मैदानावर प्रस्तावित असलेल्या बाळासाहेबांच्या नियोजित स्मारकाच्या निर्मितीच्या प्रक्रियेलाही याच कारणामुळे अडथळा येण्याची शक्यता आहे.

close