‘अंनिस’ची राज्यभर निदर्शनं

September 6, 2013 5:46 PM0 commentsViews: 100

06 सप्टेंबर : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला 17 दिवस पूर्ण झाल्यानंतरही मारेकरी अजूनही मोकाट आहेत. त्याच्या विरोधात अंनिसचे कार्यकर्ते राज्यभरात निदर्शनं करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी आपल्याला वेळ द्यावी, अशी मागणी या कार्यकर्त्यांनी केलीये. 20 ऑगस्टला सकाळी सव्वासात वाजता पुण्यात डॉ. दाभोलकर यांचा खून झाला होता. मात्र अजूनही त्यांचा खुनाबाबात काहीही तपास लागलेला नाहीय.

close