‘भाजपची भूमिका पोकळ’

September 6, 2013 6:17 PM0 commentsViews: 91

06 सप्टेंबर : राज्य सरकारनं मदरशांना जाहीर केलेल्या अनुदानावरून सुरू झालेल्या वादाला नवं वळण लागलंय. या प्रकरणी भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी मदरशांना अनुदानाच्या मुद्द्यावर भाजपची भूमिका पोकळ असल्याची टीका केलीयं. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2012 मध्ये विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. या जाहीरनाम्यात मदरशांच्या आधुनिकीकरण करणं आवश्यक असल्याचं म्हणल्याचं सावंत यांनी दावा केला.

close