‘हाच माझा मार्ग’

September 6, 2013 6:22 PM0 commentsViews: 581

06 सप्टेंबर : अभिनेता-दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांच्या आत्मकथनाचं गुरूवारी मोठ्या थाटामाटात प्रकाशन झालं. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या हस्ते या आत्मकथनाचं पार पडलं. यावेळी बॉलिवूडचा शहेनशहा अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक मोठे कलाकार उपस्थित होते. सचिन पिळगावकर यांच्या कारकिर्दीला नुकतीच पन्नास वर्षं पूर्ण झाली. हेच निमित्त साधून हे पुस्तक प्रकाशित करण्यात आलंय. राजा परांजपे दिग्दर्शित ‘हा माझा मार्ग एकला’ या चित्रपटातून सचिन यांनी बालकलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. तेच औचित्य साधून या आत्मकथनाचं शीर्षक ‘हाच माझा मार्ग ‘ असं ठेवण्यात आलंय.

close