टोल मागितला म्हणून राष्ट्रवादीच्या नगरसेवकाने टोल फोडला

September 6, 2013 7:54 PM0 commentsViews: 1147

06 सप्टेंबर : नाशिक जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार अनिल कदम यांनी टोलनाक्यावर महिला कर्मचार्‍यांना शिवीगाळ करण्याचं प्रकरण ताजं आहे. आता आणखी एका लोकप्रतिनिधीनं आपल्या सत्तेची मुजोरी दाखवलीये. टोलनाक्यावर टोल भरायला सांगितला म्हणून एका नगरसेवकानं आपल्या समर्थकांसोबत टोकनाक्याचीच जबरदस्त तोडफोड केली.

 

जालना-नांदेड रोडवरच्या रामनगरजवळ ही घटना घडलीये. आणि टोलकर्मचार्‍यांना चोप देणारे नगरसेवक आहेत राष्ट्रवादीचे नूर खान..मंगळवारी दुपारी परभणीहून जालन्याला जाताना टोलनाक्यावर कर्मचार्‍यांनी नूर खान यांच्याकडे पावती मागितली. पण, आपण नगरसेवक आहोत, त्यामुळे पावती फाडत नाही, असं नूरखान यांनी सांगितलं.

 

इतकंच नाही तर गाडीतून उतरून टोल कर्मचार्‍यालाच मारहाण करण्याचा प्रयत्न केला. त्यांनतर नूरखान यांचे समर्थक जालन्याहून टोलनाक्यावर दाखल झाले आणि त्यांनी या टोलनाक्याची तोडफोड केली. पण हा प्रकार मी किंवा माझ्या समर्थकांनी केला नाही. जवळच्या गावातील लोकांनी हा टोलनाका फोडल्याचा आरोप नूर खान यांनी आयबीएन लोकमतशी बोलताना केलाय.

close