कर्जमाफीचा निधी गेला कुठे?- उद्धव ठाकरे

January 30, 2009 1:47 PM0 commentsViews: 2

30 जानेवारी शहापूरआगामी निवडणुकांच्या प्रचारासाठी काही दिवसांपूर्वी शिवसेनेनं महाडला सभा घेतली होती. आज त्यांची शहापूरला सभा झाली. यावेळी केलेल्या भाषणात ते म्हणाले, ठाणे जिल्हातील हा भाग शेतकी पट्टा आहे. यावर्षी अनेक पिकांचं नुकसान झालं. त्याबदल्यात केंद्राने नुकासान भरपाई देऊ केली होती. तसंच कर्ज माफीही केली होती. पण हे पैसे शेतक-यापर्यंत पोहचलेच नाही, हा निधी गेला कुठे असा सवालही त्यांनी उपस्थित केला. त्याचबरोबर कर्जमाफीचे पैसे शेतक-यांपर्यंत पोहचू न देणा-या अधिका-यांवर मोर्चे काढण्याचा आदेश उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना दिला. आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात शिवसेना सर्वात जास्त जागा जिंकेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. मुंबईच्या सुरक्षेबाबत त्यांनी सरकारवर ताशेरे ओढले. तसंच आयपीएलमध्ये एकही पाकिस्तानी खेळाडूला खेळू देणार नाही अशा इशाराही त्यांनी आयपीएलच्या आयोजकांना दिला.

close