RPIची लोकसभेच्या जागेसाठी सेनेकडे लेखी मागणी

September 6, 2013 8:21 PM0 commentsViews: 603

Image img_195442_udhavonathavale_240x180.jpg06 सप्टेंबर: पुढील वर्षी होणार्‍या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. महायुतीत आरपीआयनेही जागेसाठी आताच हालचाल सुरु केली. आरपीआयनं लोकसभेच्या सहा आणि राज्यसभेच्या एका जागेची लेखी मागणी केली आहे.

 

आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवलेंनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना तसं पत्र लिहिलंय. या पत्राद्वारे आठवलेंनी लेखी स्वरुपात मागणी केलीये. आठवलेंनी पत्राद्वारे जागांची मागणी करावी, असा ठराव महायुतीच्या बैठकीत करण्यात आला होता. आठवलेंनी दक्षिण मुंबई, कल्याण, पुणे, सातारा, रामटेक आणि लातूरच्या जागा मागितल्या होत्या.

 

आरपीआय युतीत सहभागी झाल्यानंतर पहिल्या लोकसभा निवडणुकीला सामोरं जात आहे. या अगोदर महापालिकेच्या निवडणुकीत आरपीआयला फारसे यश लाभले नाही. मुंबईत आरपीआयचा एकच उमेदवार निवडून आला. पण आरपीआयचा शिवसेना आणि भाजपला मोठा फायदा झाला असा दावा आठवले यांनी केला होता. याच दाव्याच्या बळावर आता आठवले यांनी जागेची मागणी केल्याचं कळतंय.

close