पालकांविरोधात शाळेनं ठोकला तब्बल 1 कोटींचा दावा

September 6, 2013 9:40 PM0 commentsViews: 667

06 सप्टेंबर :शाळेविरोधात पोलिसांत FIR दाखल केली म्हणून एका शाळेनं माजी विद्यार्थ्यांच्या पालकांविरोधात चांगलाच सुड उगारलाय. या शाळेनं त्या पालकांविरोधात 1 कोटी रुपयांचा दावा दाखल केला आहे. संबंधित पालकांनी शाळेच्या शिक्षकांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्याविरोधात शाळेनं ही अवमान याचिका दाखल केलीये. पुष्पा गांधी यांचा 6 वर्षांचा मुलगा दादर भागातल्या ‘ऍन्टोनिया डी-सिल्वा’ या शाळेत शिकायचा. पण, शाळेतल्या एका शिक्षिकेनं त्या मुलाला अमानुष शिक्षा केली. त्याचे हातपाय चेनने बांधून शाळेत धिंड काढली. इतकंच नाही तर बाथरुममध्ये डांबूनही ठेवलं. याविरोधात पुष्पा गांधी यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. त्यानंतर मुलाला त्या शाळेतून काढून दुसर्‍या शाळेत टाकण्यात आलं होतं. पण, शाळेच्या अंतर्गत समितीनं शिक्षिका निर्दोष असल्याचा अहवाल दिला. त्यानतंर शाळेनं पुष्पा गांधींविरोधात 1 कोटी रुपयाचा दावा दाखल केलाय.

close