व्वा सर, चक्क 40 सेकंदांत पेपर तपासणी

September 6, 2013 10:02 PM3 commentsViews: 1274

गोपाल मोटघर,पुणे

06 सप्टेंबर : पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांचे पेपर किती निष्काळजीपणे तपासले जातात, याचे धक्कादायक पुरावे आयबीएन लोकमतच्या हाती लागले आहेत. विद्यापीठात एका पेपरच मॉडरेशन करण्यासाठी साधारण 3 ते 4 मिनिटांचा वेळ लागतो. पण विद्यापीठात हे पेपर चक्क 40 ते 45 सेकंदात तपासले जातात.

विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यातल्या प्राध्यापकांचा एक अदभुत प्रकार उघड झालाय. आम्हाला मिळालेल्या मॉडरेशन शिटमध्ये दिसतंय की एका प्राध्यापक महाशयांनी 60 मिनिटांत 79 पेपरच तपासले. म्हणजे 20 पानाच्या एका पेपरचं मॉडरेशन या वेगवान सरांनी 45 सेकंदात केलं. पेपर तपासणारे प्राध्यापक विद्यार्थ्यांच्या भविष्या सोबत खेळत असल्याचा आरोप या विद्यार्थ्यांनी केला आहे.

पेपर तपासणी करणे हा प्राध्यापकांकरता एक व्यवसायच झालाय आणि एवढ्या कमी सेकंदात एखाद्या पेपरच मॉडरेशन करणं अशक्य आहे, असं या क्षेत्रातील तज्ञांच म्हणणं आहे.

विद्यापीठात पेपर कशा प्रकारे तपासले जातात, यांची माहिती प्राध्यापकांच्या सुरक्षेचं कारण देत दिली जात नाही. मात्र मागील सात वर्षात एकाही मॉडरेटर कारवाई करण्यात आली नाहीये. पेपर तपासणी करणार्‍या सेंट्रल असेसमेट प्रोग्रामची चौकशी करण्याची मागणी आता जोर धरतेय.

 • Shoeb Sayed

  i hate this university! even i suffered of da suspicious paper checking by pune uni.

 • Akhilesh Tekade

  Please do something so that such things do not happen again. Students like me suffer a lot due to the ignorance of PU

 • mahesh

  yanche kunihi kahihi vakde karu shakat nahi karan hi khup mothi chain aahe.
  Paise deun pepar Rechek madhe pass karnari toli sudha yat samil aahe nit tapas kela tar pune University jagat no 1 chi bhangar univercity sidha hoil.

close