रिक्षा आणि टॅक्सीचं भाडं कमी होणार

January 30, 2009 6:18 PM0 commentsViews: 5

30 जानेवारी मुंबईपेट्रोल-डिझेलचे दर कमी झाले आहेत त्यामुळे रिक्षा आणि टॅक्सीचं भाडं कमी होतील. येत्या 15 दिवसात याबाबतचा निर्णय होणार असल्याची माहिती परिवहन सचिव सी. एस. संगीतराव यांनी दिली आहे. पेट्रोल आणि डिझेल दरातल्या कपातीनुसार रिक्षा, टॅक्सीचं भाडं कमी होणार आहे. ही भाडेकपात मुंबईत लागू होणार नाही. कारण मुंबईतील रिक्षा टॅक्सी सीएनजीवर चालतात. रिक्षा, टॅक्सी संघटनांनी आता याबाबत निर्णय घ्यायचा आहे असंही ते म्हणाले.

close