गुरांच्या दवाखान्यात सोनोग्राफी मशीनची नोंदणी अनिवार्य

September 7, 2013 3:40 PM0 commentsViews: 179

animal hospital07 सप्टेंबर : मुलींचा घटता जन्मदर आणि त्यापासून भविष्यात सामाजिक स्वास्थ बिघडण्याची शक्यता लक्षात घेत,केंद्र सरकारने गर्भ लिंग निदान आणि गर्भपाताला आळा घालण्यासाठी आणलेला पीसीपीएनडीटी (PCPNDT) कायदा आता गुरांच्या दवाखान्यावर लक्ष ठेवणार आहे.

 

मानवी रुग्णालयातीला सोनोग्राफी मशीनद्वारे होत असलेल्या गर्भपाताला आळा घातला असला तरी,याच सोनोग्राफी मशीन पशुचिकीत्सालयातही उपलब्ध आहेत. या पशुचिकीत्सालयातील सोनोग्राफी मशीनचा दुरुपयोग होत असल्याचं शासनाच्या निर्दशनास आले आहे.

 

त्यामुळे या गुरांच्या दवाखान्याची तपासणी करुन त्यांना या मशीनची नोंदणी करुन घेण्याचे सांगण्यात आले आहे. राज्यात काही ठिकाणी मुली आणि मुलांचे प्रमाण समतल झाले असून अकोला जिल्ह्यातही 10 ते 12 टक्क्यांनी वाढ झालीय.

close