अतिवृष्टीग्रस्त विदर्भाचा केंद्राकडून आढावा

September 7, 2013 3:44 PM0 commentsViews: 113

vidharbh rai ntoday07 सप्टेंबर : मुसळधार पावसामुळे विदर्भात झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारचं एक पथक 11 सप्टेंबरला विदर्भात येणार आहे. विदर्भातल्या अतिवृष्टीन झालेल्या नुकसानी संदर्भात सर्व पक्षीय शिष्टमंडळ पंतप्रधान मनमोहनसिंग आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांना भेटलं होतं. केंद्र सरकारच्या या पथकाचे दोन गट असून एक पथक शेतीच्या नुकसानीचा आढावा घेणार आहे.

 

तर दुसरं पथक पायाभूत सुविधांच्या नुकासानीचा आढावा घेणार आहे. नागपूर विभागात चंद्रपूर जिल्ह्याचं जास्त नुकसान झालंय. तर अमरावती विभागात वाशिम जिल्ह्याचं सर्वाधिक नुकसान झालंय. दरम्यान, केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार 14 तारखेपासून तीन दिवसाच्या विदर्भ दौर्‍यावर येतायत.

 

शरद पवार अकोला,वाशिम, यवतमाळ,वर्धा,गोंदिया,भंडारा आणि नागपूर जिल्ह्याला भेट देणार आहेत. अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीमुळे गेल्या तीन महिन्यात 412 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याच विदर्भ जन आंदोलन समितीच्या किशोर तिवारी यांचा दावा आहे.

close