मैला वाहून नेण्याच्या प्रथेवर लवकरच बंदी,लोकसभेत कायदा मंजूर

September 7, 2013 3:54 PM0 commentsViews: 495

maila in india07 सप्टेंबर : डोक्यावरून मैला वाहून नेण्याच्या अनिष्ट प्रथेवर बंदी घालणारा कायदा शुक्रवारी लोकसभेत मंजूर झाला. या कायद्यात या लोकांना कायमस्वरुपी सरकारी नोकरी देण्याची तरतूद आहे. आज हा कायदा राज्यसभेमध्ये चर्चेसाठी ठेवण्यात आलाय. देशात अजूनही अनेक ठिकाणी मैला माणसांकरवी वाहून नेण्याची प्रथा आहे

 

. कायद्याने या अनिष्ट प्रथेला बंदी असली तरी पर्यायी रोजगार मिळत नसल्याने हे काम अनेकांना करावं लागायचं. देशभर दीड वर्षापूर्वी यावरून पुन्हा एकदा वादळ उठलं होतं. त्यावेळी ही प्रथा कायमची बंदी करण्यासाठी सरकारने कडक उपाययोजना करावी अशी मागणी सामाजिक संघटनांनी केली होती.

 

त्यावेळी पंतप्रधानांनी 6 महिन्यात ही प्रथा बंद पाडू असं आश्वासन दिलं होतं. पण तरीही देशभर अनेक ठिकाणी अशाच प्रकारे मैला वाहून नेण्यात येत होता. अखेर यातील लोकांना पर्यायी रोजगार निर्माण करून देणं. हाच यावरचा उपाय आहे.

 

हे समोर आलं आणि असा कायदा शुक्रवारी लोकसभेने मंजूर केला. या कायद्यात या लोकांना कायमस्वरूपी सरकारी नोकरी देण्याची तरतूद आहे. आणि त्याचवेळी मैला वाहून नेण्याच्या अनिष्ट प्रथेवर कायमची बंदी घालण्यात आलीय.

close