राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची दादागिरी, टोल न देताच पळाले

September 7, 2013 2:45 PM0 commentsViews: 381

ncp toll07 सप्टेंबर : जालन्यातल्या टोलनाक्यावर धुडगूस घालणारा नगरसेवक नूर खान अद्याप फरार असताना दुसरीकडे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मात्र अजूनही आपला टारगटपणा सोडायला तयार नाहीत.

 

तोडफोड झालेल्या या टोलनाक्यावर आज कार्यकर्त्याच्या गाड्या टोल न देताच जात होत्या. औरंगाबादच्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यासाठी राष्ट्रवादीचे झेंडे लावलेल्या गाड्या खुशाल टोल चुकवत जात असल्याचं चित्र आज पाहायला मिळत होतं.

 

नूरखानसह 22 आरोपींचा पोलीस शोध घेत असताना दुसरीकडे कार्यकर्तेही नेत्याच्याच पावलावर पाऊल टाकून टगेगिरी करताना आज दिसत होते. दुपारी बारा वाजेपर्यंत जवळपास सहाशे गाड्या टोल न देता या टोलनाक्यावरुन गेल्याची सूत्रांची माहिती आहे.

close