सीएनजी 3 रुपयांनी महागले

September 7, 2013 5:27 PM0 commentsViews: 46

07 सप्टेंबर : डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण झाल्यानं त्याचा परिणाम सीएनजीवरही झाला आहे. यामुळे महानगर गॅस लिमिटेडनं सीएनजीचे दर वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक किलोग्रॅममागे सीएनजच्या दरात तीन रुपयांनी वाढ करण्यात आली. याची अंमलबजावणी आजपासूनच करण्यात आलीय. एप्रिल महिन्यापासूनची ही दुसरी दरवाढ आहे. याआधी 1 जुलैपासून सीएनजीच्या दरात दोन रुपयांनी दरवाढ झाली होती. या वेळी घरगुती गॅसच्या दरात मात्र कुठलीही दरवाढ झाली नसून त्याचे टप्पे मात्र कमी करण्यात आले आहेत. यामुळे घरगुती गॅस वापरणार्‍यांना दिलासा मिळाला आहे. सीएनजी वाढीचा थेट परिणाम बेस्ट,रिक्षा,टॅक्सी ,स्कूलबसवर होणार आहे. बेस्टच्या ताफ्यातील 4 हजार 300 बसपैकी सुमारे तीन हजार बस सीएनजीवर चालतात. त्यांना दरवर्षी 630 लाख किलो सीएनजी गॅस लागतो. त्यामुळे आधीच तोट्यात असणार्‍या बेस्टवर वर्षाकाठी आणखी 18 कोटी रूपयांचा बोजा पडणार आहे.

close