तक्रार केली म्हणून मच्छिमाराला बेदम मारहाण

September 7, 2013 5:36 PM0 commentsViews: 67

marhan07 सप्टेंबर : गंगाखेड मारहाण प्रकरण घटनेला 48 तास झाल्यानंतरही आरोपी फरारच आहे. या प्रकरणी मुख्य आरोपी बबन गुट्टवर गुन्हा दाखल करण्यात आला असून बबन हा फरार आहे.

 

परभणी गंगाखेड शुगर्स एण्ड एनर्जी लिमिटेड या साखर कारखान्याचं दुषित पाणी गंगाखेडच्या मन्नथ तलावात सोडण्यात आलंय, ज्यामुळे तलावातले मासे मरण पावले असून मच्छिमारांवर उपासमारीची वेळ आली आहे. आणि या बाबत वारंवार तक्रारी करणार्‍या मच्छिमार लक्ष्मण कचरे यांना कारखान्याच्या लोकांकडून अपहरण करून मारहाण केल्या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

 

लक्ष्मण कचरे यांना गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. दरम्यान मागील अनेक दिवसांपासून कारखाना आणि मन्नथ तलावात मासेमारी करणारे मच्छिमार यांच्यात या मुद्दयावरून वाद होत असून आता या वादात मारहाण झाल्याने पुढे यांच्यात मोठा संघर्ष होण्याची चिन्हे आहेत.

close