5 वर्षांच्या चिमुरड्याची संशयास्पद हत्या

September 7, 2013 9:15 PM0 commentsViews: 199

pandharpur newsj07 सप्टेंबर : पंढरपूर तालुक्यातील शेगाव दुमला येथे संकेत आटकळे या पाच वर्षाच्या चिमुकल्याची हत्या झालीय. ही हत्या म्हणजे नरबळीचा प्रकार असल्याचा संशय मुलाच्या पालकांनी व्यक्त केलाय.

 

अघोरी प्रथांसाठी जर आपल्या कुटुंबातील मुलाचा बळी गेला असेल, तर त्या दृष्टीनेही पोलिसांनी तपास करावा, अशी स्पष्ट मागणीच मुलाच्या मामांने केलीय. 2 सप्टेंबर रोजी संकेत घरातून नाहीसा झाला होता. सहा सप्टेंबरला घराच्या शेजारच्या शेतात त्याचा मृतदेह आढळून आला.

 

त्याच्या मृतदेहावर जखमा असून त्याची कवटी देखील फुटली होती. त्यामुळे अंधश्रद्धेतून हा प्रकार झाल्याचा संशय बळावलाय. नरबळीचा प्रकार आहे का? या दृष्टीन तपास करण्यात येईल असं आश्वासन डीवायएसपी प्रशांत कदम यांनी दिलंय.

close