पुण्यात मानाचे गणपती विराजमान

September 9, 2013 2:04 PM0 commentsViews: 460

09 सप्टेंबर : पुण्यातल्या गणेशोत्सवाची रंगत काही औरच आहे. ढोल-ताशांच्या गजरात ध्वज नाचवत पारंपारिक पध्दतीनं बाप्पांच स्वागत होतंय. भक्तांचा लाडका दगडूशेठ गणपती,देशातला पहिला भाऊ रंगारी आणि आराध्य दैवत मंडई गणपती यांच्याही मिरवणुकांनंतर प्रतिष्ठापना करण्यात आली. पुण्यातील मानाच्या पाच गणपतींचीही प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यात मानाचा पहिला कसबा गणपती, दुसरा तांबडी जोगेश्वरी,मानाचा तिसरा गुरुजी तालीम,मानाचा तिसरा तुळशीबाग आणि मानाचा पाचवा केसरी वाडा या गणपतीच्या मिरवणुकाही वाजतगाजत निघाल्या. ढोल-ताशा आणि पारंपरिक वाद्यांची पथकं ही या मिरवणुकीची खास वैशिष्ट्य असतं.

close