पाचशे रुपयात लॅपटॉप

January 30, 2009 2:38 PM0 commentsViews: 3

30 जानेवारी नवी दिल्ली सुमित पांडे तुम्हाला लॅपटॉप घ्यायचाय. आणि तुमच्या खिशात फक्त पाचशे रुपये आहेत. पण, काळजी करण्याचं काहीच कारण नाही. कारण युपीए सरकारनं स्वस्तातला लॅपटॉप बाजारात आणण्याचं ठरवलंय. येत्या 3 फेब्रुवारीला या लॅपटॉपचं लॉन्चिंग असेल. इतक्या स्वस्तातला हा लॅपटॉप बनवण्यासाठी आयआयटी मद्रास, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आणि बीटेकच्या काही विद्यार्थ्यांनी तांत्रिक सहाय्य केलंय. या लॅपटॉपची वैशिष्ट्य म्हणजे 2 वॅट पॉवर इनपूटवर हा लॅपटॉप चार्ज करता येतो. याला 2 जीबी मेमरी आहे जी नंतर अपग्रेड करता येईल. तसंच नवीन सॉफ्टवेअर्सही यात वाढवता येतील. आता या लॅपटॉपचा वापर केला जावा म्हणून पुढल्या तीन वर्षात देशभरातली सुमारे 20000 कॉलेजेस आणि इन्स्टिट्यूट्स इ-कनेक्ट केली जाणार आहेत आणि यावर खर्च केले जातील तब्बल 4,600कोटी. हा असेल युपीएचा इलेक्शन बोनांझा. फेब्रुवारी अखेरीस निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याआधी आणि आचारसंहिता लागू होण्याआधी सरकारला ही महत्वाकांक्षी योजना पूर्ण करायची आहे. तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठीच सरकारने या हायटेक मार्गाचा वापर केल्याचं दिसतंय.

close