गणेशनिधी :गतिमंद मुलांना हवा मदतीचा हात

September 9, 2013 6:59 PM0 commentsViews: 205

रोहन कदम, मुंबई

09 सप्टेंबर : आजच्या स्पर्धेच्या काळात आधुनिक शिक्षण देणार्‍या असंख्य शिक्षणसंस्था आपल्याला पाहायला मिळताहेत. मात्र आज कमतरता आहे ती शारीरीक आणि मानसिक समस्या असलेल्या मुलांनाही सामावून घेणार्‍या शाळांची. मुंबईतली “पॅराप्लेजिक फाउन्डेशन “ही अशीच एक शाळा. 1968 पासून ही संस्था मतिमंद,गतिमंद आणि कर्णबधीर मुलांना व्यावसायिक आणि दैनंदिन जीवनात उपयोगी पडेल असं शिक्षण देते.

 
तली ही आहे एकमेव स्पेशल स्कूल …. पॅराप्लेजिक फाउन्डेशन… खास मुलांची खास शाळा. पण या मुलांच्या निरागसपणामागे दडलय ते इथल्या शिक्षकांचे अपार कष्ट.
“ही मुलं जेव्हा आमच्याकडे येतात तेव्हा पहिला आमचा फोकस फ क्त पुस्तकी शिक्षणावर नसतो.आम्ही त्यांना बँकेत घेउन जातो,त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन जातो.आताच आमच्या टीमनं पोलीस स्टेशनमध्ये रक्षाबंधन साजरा केला. अगदी रेल्वे स्टेशनला जाऊन कुठे तिकीट काढायचं,बसमध्ये बसलात तर कसं जायचं,हे शिक्षण त्यांना मिळालं की, ते उद्या जाऊन नोकरी करू शकतील असा विश्वास संस्थापिका सुलभा वर्दे यांनी व्यक्त केला.

 
या सेंटरच्या “संजिवनदिप” या प्रोजेक्टअंतर्गत मतिमंद,गतिमंद आणि कर्णबधीर मुलांना त्यांच्या गरजांप्रमाणे शिकवलं जातं.शिवाय अपंग मुलांसाठी इथं फिजिओथेरपीची देखिल सोय आहे,आणि तिही अगदी विनामुल्य. सध्या या सेंटरमध्ये पहिली ते दहावीचे 102 विद्यार्थी शिकत आहेत,आणि त्यांना साथ मिळतेय ती संस्थेच्या दहा सेवाभवी शिक्षकांची.
या मुलांसाठी आयुष्य सोपं नसेलही कदाचित… पण या सेंटरच्या मदतीने आत्मनिर्भर होऊ पहाण्याच्या या मुलांच्या प्रयत्नांना आणि खंबीरपणे न डगमगता त्यांच्या पाठीशी उभ्या राहणार्‍या या शिक्षकांना सलाम.

मदतीसाठी संपर्क
“पॅराप्लेजिक फाउन्डेशन”
संजीवनदीप, प्लॉट नंबर 4
सेक्टर 18, ऐरोली
नवी मुंबई – 400708
www.paraplegicfoundation.in
 

close