दाऊदला पकडण्यासाठी अमेरिकेची मदत घेणार-शिंदे

September 9, 2013 9:44 PM0 commentsViews: 340

sushilkumar shinde09 सप्टेंबर : दहशतवादी अब्दुल करीम टुंडा, यासीन भटकळ यांच्यानंतर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मुसक्या आवळण्यासाठी केंद्रीय गुप्तचर खात्याने कंबर कसलीय. आता यासाठी अमेरिकेची मदत घेणार असल्याचं केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी स्पष्ट केलं.

 

काही दिवसांपुर्वी सुशीलकुमार शिंदे यांनी दाऊद हा पाकिस्तानच लपला असून त्याला लवकरच भारतात आणू असा विश्वास व्यक्त केला होता. शिंदे यांनी अलीकडेच एक वृत्तवाहिनीला मुलाखतीत दिली. या मुलाखतीत शिंदे म्हणतात, अलीकडे आम्ही कुख्यात दहशतवाद्यांना अटक केली.

 

आता अमेरिकेची मदत घेऊन कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला अटक करून भारतात आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. यासाठी आम्ही अमेरिकेकडे मदत मागितली आहे असं शिंदे यांनी स्पष्ट केलं. दाऊद इब्राहिमवर मुंबईतील साखळी स्फोट, अपहरण, खूनाचे गुन्हे दाखल आहे. विशेष म्हणजे अलीकडे अब्दुल टुंडा, यासीन भटकळ सारख्या खतरनाक दहशतवाद्यांना बेड्या ठोकण्यात गृहखात्याला यश मिळालंय.

close