नरेंद्र मोदींच्या उमेदवारीला संघाचा खो, भाजपचं वेटिंग

September 10, 2013 2:56 PM0 commentsViews: 729

ram madhav on modi10 सप्टेंबर : पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी भाजपचे प्रचारप्रमुख नरेंद्र मोदींच्या नावाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पसंती असल्याची भावना संघाने भाजपला कळवलीये. संघाचे प्रवक्ते राम माधव यांनी यासंदर्भात माहिती दिली. देशाला बदल हवाय, पण निर्णय भाजपने घ्यायचाय असं राम माधव म्हणाले.

 

लोकांना काय बदल हवा आहे, ते सर्वांना माहित आहे. आमचं काम फक्त मार्गदर्शन करण्याचं आहे असंही राम माधव म्हणालेत. तर निर्णय काय आणि कधी घ्यायचा ते भाजपचे नेते ठरवतील हेही राम माधव यांनी स्पष्ट केलंय.

 

गेल्या आठवड्यात दिल्लीत भाजप नेत्यांच्या गुप्त बैठका पार पडल्यात. या बैठकीत मोदींच्या नावावर चर्चा झाली असून संघाने मोदींच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचं सूत्रांनी सांगितलंय. मात्र नरेंद्र मोदींच्या नावाला भाजपमधून विरोध आहे. जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी मोदींच्या नावाला

close