साहित्य संमेलनासाठी 25 लाखांचा निधी : साहित्यिकांची जोरदार टीका

January 30, 2009 3:54 PM0 commentsViews: 4

30 जानेवारी, मुंबई अमेरिकेत होणार्‍या विश्व मराठी साहित्य संमेलनाला महाराष्ट्र सरकारनं 25 लाखांचं अनुदान दिलंय. याविरोधात राज्यभरातल्या साहित्यिकांमध्ये तीव्र असंतोष उसळलाय. अमेरिकेतल्या मराठी साहित्य संमेलनाला अनुदान देणं म्हणजे पैसे पाण्यात घालणं असल्याची टीका साहित्यिकांमधून व्यक्त होतेय.