दिल्ली गँगरेप प्रकरणाचा घटनाक्रम

September 13, 2013 3:25 PM0 commentsViews: 677

10 सप्टेंबर : विरोधक, सरकार, सामान्य नागरिक या सगळ्यांना खडबडू जागं करणारी घटना म्हणजे 16 डिसेंबर 2012 मध्ये दिल्लीत झालेला बलात्कार…कोलमडलेल्या कायदा व्यवस्थेची जाणीव होण्यासाठी या बहादूर मुलीला आपले प्राण गमवावे लागले, याचं दुख व्यक्त केलं जातंय. फक्त दिल्ली, मुंबईच नाही तर देशातल्या शहरा-शहरांतून त्या बहादूर मुलीला न्याय मिळावा, यासाठी आंदोलनं पेटली. मोर्चे निघाले, बुलंद आवाज उठला. या प्रकरणाचा हा घटनाक्रम…

त्या भंयकर घटनेनंतर लगेचंच संपूर्ण देशात निषेधाचा सूर उमटला. त्या बहादूर मुलीला न्याय आणि महिलांना सुरक्षा मिळावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली.

22 डिसेंबरला हे आंदोलन सुरू झालं. दिल्लीतल्या जंतरमंतरवरून हा मोर्चा इंडिया गेटकडे निघाला आणि तिथून थेट रायसिना हिलला… पण, त्यांना पोलिसांच्या लाठ्या मिळाल्या. सार्वजनिक वाहतूक बंद करून पोलिसांनी आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. पण, यामुळे आंदोलनाला आणखी बळ मिळालं. एकीकडे त्या बहादूर मुलीची प्राणज्योत हळूहळू मावळत चालली होती तर दुसरीकडे लोकांचा संताप तीव्र होत होता. अखेर पंतप्रधानांना देशासमोर यावचं लागलं. महिला आणि मुलांच्या सुरक्षेसंदर्भातल्या सगळ्या बाबी आम्ही तपासून पाहू असं आश्वासन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दिलं. जनतेच्या या रेट्यामुळेच घटनेच्या चार महिन्यात बलात्कारविरोधी कडक कायदा करण्यात आला.

close