मुलाच्या चितेवर वडिलांची आत्महत्या

September 10, 2013 7:05 PM1 commentViews: 2747

10 सप्टेंबर : मुलानं आत्महत्या केल्याचं दु:ख असह्य झाल्यानं अंत्यसंस्कारानंतर वडिलांनी आपल्या मुलाच्या चितेत उडी घेऊन आत्महत्या केल्याची ह्रदयद्रावक घटना जालना जिल्ह्यात घडली. परतूर तालुक्यात सातोना गावात राहणारे मुरलीधर आकात यांचं काही दिवसांपूर्वी मुलगा सुखदेव यांच्यासोबत कडाक्याचं भांडण झालं होतं.

 

भांडण विकोपाला गेल्यानंतर सुखदेवने आत्महत्या केली. सुखदेववर अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्याचे वृद्ध वडील घरी परतले. मात्र त्यांचं मन त्यांना खात होतं. आपल्यामुळंच आपल्या मुलानं आत्महत्या केली असा स्वत:लाच दोष देत ते हळहळत होते.

 

थोड्यावेळानं मी जरा येतो असं सांगून ते पुन्हा स्मशानभूमीत गेले आणि त्यांनी चितेत स्वत:ला जाळून आत्महत्या केली. शोधाशोध सुरू झाल्यानंतर त्यांच्या वस्तू चितेच्या आसपास आढळल्या आणि ही दु:खद घटना उघड झाली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होतेय. दरम्यान, मुलाच्या मृत्यू प्रकरणी परभणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

  • Fans of Allu

    shant dokyane rahat ja……………ugach bhandan karu naye

close