यवतमाळची द्राक्षं युरोपच्या वाटेवर

January 30, 2009 3:59 PM0 commentsViews: 5

30 जानेवारी, यवतमाळभास्कर मेहरे विदर्भातला यवतमाळ जिल्हा, कापसाचं पीक घेणारा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे. पण हा समज खोटा ठरवलाय आहे यवतमाळ जिल्ह्याच्या संजय जैस्वाल या शेतकर्‍यानं. त्यांनी आपल्या अडीच एकर शेतीवर द्राक्षाचं भरघोस पीक घेतलंय. ही द्राक्षं आता युरोपच्या वाटेवर आहेत.यवतमाळच्या चानी कामठवडा गावात कापसाचं पीक घेऊन कंटाळलेल्या संजय जैस्वाल यांनी वेगळा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला, आणि कृषी विद्यापीठाकडून माहिती घेऊन द्राक्षाचं पीक घेतलं. त्यांनी द्राक्षाचं पीक घेतलं. सिंचनाची सोय नसल्यानं इथला शेतकरी वेगळा प्रयोग करायलाही घाबरतो, पण जैस्वाल यांनी ती हिंमत दाखवलीय. त्यांचा कापासाच्या जमिनीवर द्राक्ष घेण्याचा प्रयोग पाहण्यासाठी आजूबाजूच्या गावातूनही शेतकरी येतात.पाच एकर पैकी दोन एकर वर त्यांनी ही द्राक्षं लावली. त्यांना खर्च आला अडीच लाख.आणि उत्पन्न झालं 4 लाखाचं म्हणजे फायदा झाला दीड लाखांचा. पहिल्याच प्रयत्नात आलेलं हे यश पाहून त्यांनी इतर 3 एकरवरसुद्धा द्राक्षं लावण्याचा निश्चय केलाये. लवकरच त्यांच्या बागेतली पहिली द्राक्षपेटी युरोपवारीसाठी सज्ज होईल.

close