डोंबिवलीत डेंग्युच्या साथीचं थैमान, तीन जणांचा मृत्यू

September 10, 2013 9:07 PM0 commentsViews: 109

Image img_220882_dengue_240x180.jpg10 सप्टेंबर : मुंबईजवळच्या डोंबिवली शहरात मोठ्याप्रमाणावर डेंग्युची साथ पसरलीय. खासगी आणि सरकारी रुग्णालयात अडीच हजाराहून अधिक रुग्ण दाखल आहेत. यातल्या तीन जणांचा डेंग्युमुळं बळी गेलाय.

 

शहरात ठिकठिकाणी असलेली अस्वच्छता, रस्त्यावर पडलेले खड्डे, अडचणीच्या जागेत साचलेलं पाणी अस चित्र सर्वत्र दिसतंय. याचाच परिणाम शहरात डेंग्यूची साथ सुरु झालीय. डेंग्युमुळे अस्लम शेख, विनोद पांडे आणि अक्षरा सुटे अशा तिघांचा बळी गेलाय.

 

पण यात महापालिकेच्या रुग्णालयाचा हलगर्जीपणा असा की विवेक जाजड हे नागरिक आपल्या मुलीला जेव्हा रुख्मणी हॉस्पिटलमध्ये दाखल करायला गेले, तेव्हा तुम्ही तिला कळव्याला किवा सायन हॉस्पिटलला घेऊन जा असं सांगत टाळाटाळ केली.

close