पुण्यात खंडपीठाच्या मागणीसाठी वकिलांचा मोर्चा

September 10, 2013 9:29 PM0 commentsViews: 91

pune coart10 सप्टेंबर : कोल्हापूर पाठोपाठ पुण्यातही हायकोर्टाच्या खंडपीठाची मागणी जोर धरू लागलीय. पुण्यात मुंबई हायकोर्टाचे खंडपीठ व्हावं या मागणीकरता आज पुणे बार असोसिएशनच्या वतीने पुणे जिल्हा न्यायालय ते जिल्हाधिकारी कार्यालय असा धडक मोर्चा काढण्यात आला.

 

या मोर्च्यात मोठ्या संख्येने वकील सहभागी झाले होते. तसंच शासनाने 1978चा ठराव लागू करावा अशी मागणी बार असोसिएशनच्या वतीने करण्यात आली. मागणी मान्य झाली नाही तर आणखी तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी असोसिएसनकडून देण्यात आला.

close