विद्यार्थ्यांनी मीडियाशी बोलू नये,कॉलेजचा फतवा

September 10, 2013 9:35 PM0 commentsViews: 385

chm collage10 सप्टेंबर : कल्याण तालुक्यातल्या उल्हासनगरमधल्या सी.एच.एम कॉलेजनं एक अजब फतवा काढलाय. कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मीडियाशी बोलू नये आणि सक्रीय राजकारणात भाग घेऊ नये असा आदेश या कॉलेजनं काढलाय.

 

याला शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध केलाय. या विरोधामुळे कॉलेजच्या मुख्याध्यापिकांनी कॉलेजच्या समितीशी बोलून योग्य ती दुरुस्ती करू असं आश्वासन दिलंय. कॉलेज व्यवस्थापन सध्या विद्यार्थ्यांकडून एक अंडरटेकिंग लिहून घेत आहे. त्यात याही मुद्यांचा समावेश आहे.

 

या अगोदर पुणे विद्यापीठांच्या अंतर्गत कॉलेजसाठी असाच फतवा काढण्यात आला होता. मात्र माध्यमांनी या प्रकरणाची बाचा फोडताच निर्णय मागे घेण्यात आला होता.

close