भाऊ काटदरे अर्थ हिरो पुरस्काराने सन्मानित

January 30, 2009 6:16 PM0 commentsViews: 8

30 जानेवारीआरती कुलकर्णीपर्यावरण वाचवावं. जंगल राखावं असं आपल्या प्रत्येकाला वाटतं. पण काही झपाटलेल्या माणसांनी निसर्गाची ही हाक ऐकली आणि त्यासाठी आयुष्य दिलं. सँक्च्युअरी हे वाइल्डलाइफला वाहिलेलं मासिक अशा झपाटलेल्या कार्यकर्त्यांचा गौरव करतं. यावर्षी यातले एक हिरो आहेत.सह्याद्री निसर्ग मित्रचे भाऊ काटदरे.भाऊ काटदरे अख्खं कोकण यांना कासववाले म्हणून ओळखतं. आजवर त्यांनी ऑलिव्ह रिडले कासवांच्या हजारो पिल्लांना समुद्राच्या हवाली केलं आहे. समुद्री गरुडाचं सर्वेक्षण असो की सिंधुदुर्गातल्या पाकोळ्यांच्या घरट्यांची तस्करी रोखण्याचं काम. गेली 16 वर्षं यांनी कोकणाचं वन्यजीवन जपण्यासाठी अथक पहारा दिला आहे. सह्याद्री निसर्ग मित्रच्या विश्वास काटदरेंना जेव्हा सँक्च्युरी ऍवॉर्डसमध्ये अर्थ हिरो म्हणून जाहीर केलं तेव्हा त्यांचं एकच म्हणणं होतं, हे निर्सग रक्षणाचं मोठ काम आहे हे एका व्यक्तीचं, एका संघटनेचं काम नाही. आम्हाला लिमिटेशन्स आहेत आणि आव्हानं ही खूप आहेत. त्यामुळे सरकारने याकडे लक्ष दिलं पाहिजे तसंच निधीही दिला पाहिजे. पण या अशा कामात भाऊ काटदरे एकटेच नाहीत.अशा 6 अर्थ हिरोजचा या सोहळ्यात गौरव झाला. पण या सगळ्यांचे उस्ताद फतेहसिंग राठोड ज्यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. रणथंबोरच्या व्याघ्रप्रकल्पासाठी आयुष्यभर झटणारे फतेहसिंग राठोड यांचा एकच नारा आहे, वाघ को बचाना है.. तो जंगल बचाओ…नदीयाँ बचाओ…

close