गणेश भक्तांवर विषारी माशांचा हल्ला, गिरगाव चौपटीवरील घटना

September 10, 2013 8:22 PM3 commentsViews: 4171

eel fesh 210 सप्टेंबर : मुंबईतील गिरगाव चौपाटीवर दीड दिवसांच्या गणरायाला निरोप देण्यासाठी समुद्रात उतरलेल्या गणेशभक्तांवर विषारी माश्यांनी हल्ला केलाय. विषारी मासे चावल्यामुळे 55 भक्त रुग्णालयात दाखल झाले आहे. पाकट, वाम आणि इल माशांनी चावा घेतल्याचं सांगण्यात येत आहे.

 

इल माशांच्या दंशात विषारी टॉक्सिन असल्यामुळे अनेक गणेश भक्तांना मळमळ उलट्याचा त्रास झाला. माशांच्या दंशामुळे हा प्रकार लक्षात आल्यामुळे अनेक भक्तांनी समुद्रातून बाहेर पळ काढला. 55 गणेश भक्तांपैकी 30 जणांना नायर हॉस्पिटल, तर 12 जणांना जेजे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय.

 

यातील कुणाचीही प्रकृती गंभीर नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. या रुग्णावर उपचार करून डॉक्टरांच्या निगराणी खाली ठेवण्यात आलंय. या प्रकरणी कोणत्या जातीचे मासे चावले यांचे नमुने घेण्याच काम सुरू आहे. दरम्यान, भक्तांनी पाण्यात जाऊ नये असं आवाहन समन्वय समितीच्या वतीने करण्यात आलंय.

 • रविंद्र गांगल

  आम्ही श्रींच्या मूर्ती विसर्जनात अजून किती “प्लास्टर ऑफ प्यारीस”

  समुद्र, नद्या मध्ये विसर्जनाच्या माध्यमातून सोडणार आहोत !

  आता तरी…………

  गणराया, परत एकदा शाडूच्या मूर्ती तयार करण्याची सुबुद्धी दे बाबा !

 • Sharad Shevade

  हे काहीत/री नवीनच आहे ,तर मत्स्य विभाग , किंवा फोरेस्ट खाते किंवा ओशनोग्राफिचे लोक याचा शोध घेणार का ?

 • एक गणसेवक

  मुंबईतील गिरगाव चौपाटीवर दीड दिवसांच्या गणरायाला निरोप देण्यासाठी समुद्रात उतरलेल्या गणेशभक्तांवर विषारी माश्यांनी हल्ला केलाय. आपण त्याच्या प्रजोत्पादनच्या काळात प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशर्तींचे विसर्जन त्यांच्या परिसरात करून त्यांची अपरिमीत हानी करतो, त्यांचा परिसर, त्यातील पोषक वातावरण आपण उध्वस्त करतोय ह्याची जाणीव सुध्दा आपल्याला नाही. तसेच आपण गणेशोत्सवादरम्यान जुगार-मटका सदृश्य पैसे लावून खेळण्याचे मांडून, कित्येक तरुण पिढ्या, लोकांचे संसार उध्वस्त करत आहोत. हे पण आपल्या सांस्कृतिवर हल्ले आहेत, असे अंधेरी पश्चिम येथील ’नवसाला पावणा-या’ त्या ’अंधेरीच्या राजा’चा गणेशोत्सव मंडळाला अजिबात वाटत नाही असेच वाटते.

  गेली काही वर्षे कामानिमीत्त बाहेर असल्याने मुंबई उपनगरातील काही प्रमुख गणेशांचे दर्शन घेता आले नाही, आज रात्री तब्बल तीन वर्षांनी आझाद नगर अंधेरी पश्चिम येथील ’अंधेरीच्या राजाचे’ दर्शन घेण्याचा योग आला. त्या रात्री गणेशाचे दर्शन घेऊन बाहेर पडताना जे काही निदर्शनास आले ते अतिशय दुख:द् आणी मन विवष्ण करणारे होते. बाहेर पडताना डाव्या हाताला पडदे लाऊन् आडोसे निर्माण केले काही स्टॉल्स् होते, तिथे बरीच गर्दी होती म्हणून् सहजच डोकावले आणी आश्चर्याचा धक्काच बसला, कारण तिथे चक्क् जुगार-मटका चालू होता. (स्थानिक पोलीस, स्थानीक राजकारणी त्याला जुगार-मटका सदृश्य पैसे लावून खेळण्याचे काही खेळ असे सुध्दा म्हणतील). आधिक चौकशी करता कळले की हा सर्व प्रकार आजच सुरू झालेला नाही, हे सर्व गेली २०-२५ वर्षांपासून चालू आहे, मला तो आजच समजला.

  आझाद नगर उत्सव समिती हा गणेशोत्सव गेली सत्तेचाळीस वर्षे अतिशय सुंदर आणी शिस्तबध्द पध्दतीने, सामाजिक बांधिलकी जपत विवीध लोकोपयोगी, समाजाभिमुख कार्यक्रम राबवीत आहे, अशा मंडळाला, मंडळाच्या पदाधिका-यांना ’नवसाला पावणा-या’ ह्या अंधेरीच्या राजाच्या मंडपापासून पंधरा-वीस पावलावर, अंधेरीच्या राजाच्याच मैदानातच हे जुगार-मटक्याचे स्टॉल्स् म्हणावे की अड्डे जत्रेचाच भाग म्हणून कसे चालू शकतात? का हे सर्व स्थानिक पलिका सभागृह नेता, जे तिथेच जवळपास विद्यमान (आणी ह्या मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक सुध्दा) आहेत् त्यांचा आणी स्थानिक पोलिसांच्या आशिर्वादानेच चालू आहे. ह्या ’नवसाला पावणा-या अंधेरीच्या राजा’च्या चौकात, प्रांगणात गेली कित्येक वर्षे चालू असलेले हे जुगार-मटक्या सारखे अभद्र प्रकार बंद करावे अशी बुध्दी भगव्याशी बांधिलकी सांगणा-या स्थानिक नगरसेवकांना किंवा पोलिसांना एवढ्या वर्षात एकदाही होऊ नये ह्याचेच आश्चर्य् वाटते. त्याहून आश्चर्याची-खेदाची गोष्ट म्हणजे इथला गणेशोत्सवाचे कव्हरेज करायला विवीध वृत्तवाहीन्या आणी त्यांचे प्रतिनिधी यांची रोज ये-जा असते आणी त्यातील एका ही वृत्तप्रतिनिधीच्या निदर्शनास ही गोष्ट आली नाही, हीच मोठी लाजिरवाणी गोष्ट् आहे. जनाची नाही तर किमान मनाची लाज, शरम जर का कोणा मंडळाच्या पदाधिका-याला, पोलीस अधिका-यांना वाटत असेल तर ह्या गणेशोत्सवाच्या जत्रेत बेशरमपणे चालू असलेले जुगार-मटकयाचे स्टॉल्स् त्वरीत काढून टाकावेत आणी लोकांचे संसार उध्वस्त करणारा दळभद्री प्रकार कायमचा बंद करावा एवढीच ह्या गणसेवकाची ’नवसाला पावणा-या’ त्या ’अंधेरीच्या राजा’च्या चरणी प्रार्थना.

close