अ‍ॅपलचा आयफोन 5एस, 5सी लॉन्च

September 11, 2013 10:20 AM2 commentsViews: 5175

apple iphone 5c11 सप्टेंबर : मोबाईल क्षेत्रात दादा कंपनी असलेल्या अ‍ॅपलने आपले स्वस्त आणि मस्त असे दोन आयफोन लॉन्च केले आहे. यातल्या पहिल्या मोबाईलला हा आयफोन 5सी असं नाव देण्यात आलंय. तर दुसर्‍या फोनला आयफोन 5 एस नाव देण्यात आलंय. हे दोन्हीही फोन किमान 13 हजार ते कमाल 25 हजारांदरम्यान मिळतील.

 

13 सप्टेंबरपासून या फोनसाठी प्रिबुकिंग सुरू होणार असून 20 सप्टेंबरपासून हा फोन विक्रीसाठी बाजारात उपलब्ध होणार आहे. आयओएस (IOS)7 ऑपरेटिंग सिस्टिम या फोनमध्ये असणार आहे. अमेरिकेतील आपल्या मुख्य कार्यालयात अ‍ॅपलने मोठ्या दिमाखादार सोहळ्यात हे स्वस्त आयफोन लॉन्च केलेत.

 

आयफोन 5 एस हा आयफोन 5चं अपग्रेडेड मॉडेल असून यामध्ये A7 प्रोसेसर आहे. यासोबतच 5 एसचा कॅमेरा पूर्वीच्या आयफोन 5 पेक्षा अधिक चांगला आहे. या फोनचं वैशिष्टय म्हणजे यामध्ये फिंगर प्रिंट आईडी आहे. यामुळे तुमचा फोन तुमच्या बोटाची ठसे घेऊन सुरू होतो.’आयफोन 5 एस’ किंमत 16 जीबीसाठी 199 डॉलर (सुमारे 13 हजार रुपये),32 जीबीसाठी 299 डॉलर (सुमारे 19 हजार रूपये),64 जीबीसाठी 399 डॉलर (सुमारे 25 हजार रूपये) असणार आहे. तर ‘आयफोन 5 सी’ची 4 इंचाची स्क्रिन असून 8 मेगा पिक्सेलचा कॅमेरा आहे. या फोनची किंमत  32 जीबीसाठी 199 डॉलर (सुमारे 13 हजार रूपये) असणार आहे.

 

 

 

close