केदारनाथ मंदिरात पूजा

September 11, 2013 3:00 PM0 commentsViews: 148

11 सप्टेंबर : उत्तराखंडात प्रलयकारी पावसामुळे उद्‌ध्वस्त झालेल्या केदारनाथ मंदिरात आज तब्बल 85 दिवसांनी प्रार्थनेचे सूर उमटले. या मंदिरात आज विधीवत पूजा करण्यात आली. यावेळी 24 पुजारी आणि मंदिर समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. उत्तराखंडमध्ये तीन महिन्यांपूर्वी अतिवृष्टी आणि ढगफुटीमुळे प्रलंयकारी पूर आला होता. त्यामध्ये केदारनाथ मंदिर परिसराचं अतोनात नुकसान झालं होतं. तसंच हजारो जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मदतकार्यासाठी काही काळ हे मंदिर बंद ठेवण्यात आलं होतं.आज तिथं पुन्हा एकदा पूजा सुरू झाली. पण मंदिरात जाऊन दर्शन घेण्यासाठी भाविकांना अजून थोडा वेळ वाट पाहावी लागणार आहे.

close