मुतालिकची एटीएस चौकशी करणार

January 30, 2009 4:42 PM0 commentsViews:

30 जानेवारी मंगलोरश्रीराम सेनेचा प्रमुख प्रमोद मुतालिक यानं मालेगाव स्फोटाशी संबंध असल्याचा इन्कार केलाय. मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी मुतालिकची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्राच्या एटीएसचं पथक मंगलोरमध्ये आहे. मुतालिकला एका दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आली आहे. गेल्या रविवारी पबवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. मालेगाव स्फोटातला आरोपी कर्नल प्रसाद पुरोहित याच्याशी मुतालिकचे संबंध असल्याचा संशय आहे. त्याप्रकरणी एटीएस त्याची चौकशी करणार आहेत. दरम्यान, मुतालिकचा मालेगाव स्फोटाशी थेट संबंध नसल्याचं पोलिसांनी सांगितलंय. पण त्याचं नाव स्फोटातल्या आरोपींच्या संभाषणात आलं होतं. तसंच श्रीराम सेनेनं साध्वी प्रज्ञा हिच्याविषयी सहानुभूतीही व्यक्त केली होती.

close