विनोबा भावेंची जयंती

September 11, 2013 3:09 PM0 commentsViews: 56

11 सप्टेंबर: आचार्य विनोबा भावे यांची आज 118 वी जयंती आहे. विनोबा भावे यांच्या कार्यातल्या अनेक प्रसंगांचं वर्धा शहर साक्षीदार आहे. 1938 मध्ये विनोबा प्रथमच वर्ध्यात धाम नदीच्या काठी असलेल्या पवनार या गावी आले. त्याच ठिकाणी 1940 ला महात्मा गांधींनी व्यक्तिगत सत्याग्रहातला पहिला सत्याग्रही होण्याचा मान विनोबांना दिला. 1951 मधील भूदान पदयात्रेची सुरुवात होईपर्यंत विनोबा याच पवनार आश्रमात राहिले होते. या आश्रमात आजही विनोबांच्या विचाराचा प्रसार आणि प्रचाराचं काम सुरु आहे. कुठलीही समिती नाही वा
संचालक मंडळ नाही अशा या आश्रमात देशातील विविध प्रदेशातून आलेल्या 26 भगिनी शांती आणि अहिंसेचा विचार देण्याचं काम करताय.

close