भरधाव कारने सहा जणांना उडवले

September 11, 2013 4:58 PM0 commentsViews: 520

car dhadak11 सप्टेंबर : कल्याणमध्ये भरधाव कारने खडकपाडा सर्कल जवळून गोदरेज हिल्सकडे जात असताना सहा जणांना उडवले. त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे.

 

हा प्रकार पाहून घटनास्थळी असणार्‍या नागरिकांनी धाव घेतली. आणि अपघातात जखमींना ताबडतोब जवळच्या आयुष या खाजगी रूग्णालयात दाखल केलं. त्यावेळी काही संतापलेल्या नागरिकांंनी आयटेन गाडीचा ड्रायव्हर प्रदीप पवार यास बेदम मारहाण केली.

 

तसंच त्याच्या गाडीचीही तोडफोड केली. जखमींपैकी मोटारसायकल स्वार दिनेश मुळे आणि मुलगी कृतिका ठाणगे यांची नावं समजली असून एक महिला आणि तीन पुरूष जखमींची नावं अद्याप कळू शकली नाही. मोटारसायकलस्वार दिनेश मुळे यांची प्रकृती गंभीर आहे.

close