कोणत्या फाईल अडवल्यात पवारांनी स्पष्ट करावं -ठाकरे

September 11, 2013 5:15 PM0 commentsViews: 1009

11 सप्टेंबर : मुख्यमंत्र्यांनी लोकहिताच्या फाईल्स अडवून न धरता महत्त्वाचे निर्णय घेतले आहे. जर मुख्यमंत्र्यांनी कोणत्या फाईल्स अडवून धरल्या हे पवारांनी स्पष्ट करावं असा प्रतिप्रश्न करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी शरद पवारांना टोला हाणला. मुख्यमंत्र्यांनी अनेक फाईली मार्गी काढल्या आहेत. त्याचे चांगले परिणाम पाहण्यास मिळाले. परंतू कोणत्या फाईली काढल्या नाहीत, कोणत्या फाईलींवर सह्या केल्या नाही हे मुख्यमंत्रीच सांगू शकतील असंही माणिकराव म्हणाले. प्रलंबित फाईल्सवरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर निशाणा साधला. महत्त्वाच्या फाईल्स मार्गी लागत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करताना पवारांनी मुख्यमंत्र्यावर टीका केली. पण पवारांच्या या टीकेला काँग्रेसनं लगेच प्रत्युत्तर दिलंय.

close