अन्सल बंधूंची जामिनावर सुटका

January 30, 2009 12:55 PM0 commentsViews: 1

30 जानेवारी दिल्लीदिल्लीतल्या उपहार थिएटर जळीत हत्याकांडतल्या 59 बळींच्या कुटुंबीयांना सुप्रीम कोर्टाच्या एका निर्णयामुळे धक्का बसला आहे. उपहार थिएटर जळीतकांडातले आरोपी सुशील आणि गोपाल अन्सल या दोघा बंधूंना कोर्टानं जामीन मंजूर केला आहे. अन्सल बंधू गेल्या वर्षभरापासून जेलमध्ये आहेत. दिल्ली हायकोर्टानं त्यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावली होती. दिल्ली हायकोर्टाच्या या निर्णयाला अन्सल बंधूंनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं. सुप्रीम कोर्टानं त्यांना 10,000 रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. 12 वर्षांपूर्वी झालेल्या उपहार सिनेमातल्या जळीतकांडात 59 लोकांचा बळी गेला होता.

close