आला आयफोन 5एस आणि 5सी

September 11, 2013 7:43 PM0 commentsViews: 1972

मोबाईल क्षेत्रात दादा कंपनी असलेल्या अ‍ॅपलने आपले स्वस्त आणि मस्त असे दोन आयफोन लॉन्च केले आहे. यातल्या पहिल्या मोबाईलला हा आयफोन 5सी असं नाव देण्यात आलंय. तर दुसर्‍या फोनला आयफोन 5 एस नाव देण्यात आलंय. हे दोन्हीही फोन किमान 13 हजार ते कमाल 25 हजारांदरम्यान मिळतील. आयओएस (IOS)7 ऑपरेटिंग सिस्टिम या फोनमध्ये असणार आहे. आयफोन 5 एस हा आयफोन 5चं अपग्रेडेड मॉडेल असून यामध्ये A7 प्रोसेसर आहे. यासोबतच 5 एसचा कॅमेरा पूर्वीच्या आयफोन 5 पेक्षा अधिक चांगला आहे. या फोनचं वैशिष्टय म्हणजे यामध्ये फिंगर प्रिंट आईडी आहे. यामुळे तुमचा फोन तुमच्या बोटाची ठसे घेऊन सुरू होतो.’आयफोन 5 एस’ किंमत 16 जीबीसाठी 199 डॉलर (सुमारे 13 हजार रुपये),32 जीबीसाठी 299 डॉलर (सुमारे 19 हजार रूपये),64 जीबीसाठी 399 डॉलर (सुमारे 25 हजार रूपये) असणार आहे. तर ‘आयफोन 5 सी’ची 4 इंचाची स्क्रिन असून 8 मेगा पिक्सेलचा कॅमेरा आहे. या फोनची किंमत  32 जीबीसाठी 199 डॉलर (सुमारे 13 हजार रूपये) असणार आहे.

close