गौरींचं आगमन

September 11, 2013 8:31 PM0 commentsViews: 158

11 सप्टेंबर : बाप्पांच्या आगमनानं सर्व घरोघरी सध्या मंगलमय वातावरण आहे. त्यात आता आणखी भर पडली. कारण आज आगमन झालं ते माहेरवाशीण गौरींचं. कोकणात खास पारंपारिक पद्धतीने गौरींची स्थापना केली जाते. महिला मिळून गावाजवळच्या नदी किंवा ओढयावर जातात आणि पाच प्रकारची पानं फुलं गोळा करतात. गावाजवळच्या पाणवढ्यावरून जावून निसर्गातल्या ज्या नवीन आलेल्या गोष्टी असतात त्यांच्या साक्षीनं गौरींना घरी नेण्याची कोकणात प्रथा आहे.

close