अशी आहे मनोधैर्य योजना

September 11, 2013 8:44 PM0 commentsViews: 340

11 सप्टेंबर : महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा सध्या ऐरणीवर असताना मनोधैर्य योजनेला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिलीय. लैंगिक अत्याचार झालेल्या महिलांना आयुष्य नव्यानं उभं करण्यासाठी ही योजना तयार करण्यात आलीय.

लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळे अत्याचारग्रस्त मुलीचं संपूर्ण आयुष्यच बदलून जातं. अशा मुलींना जीवनाची नवी सुरुवात करण्यासाठी राज्य सरकारची मनोधैर्य योजना उपयोगी ठरणार आहे. या योजनेत पीडित महिलांना पुनर्वसनासाठी आर्थिक आणि मानसिक आधार दिला जाणार आहे. 2 ऑक्टोबर पासून ही योजना राज्यभरात लागू होणार आहे.
मनोधैर्य योजना

  • लैंगिक अत्याचारग्रस्त महिलांना उपचाराचा खर्च मिळणार
  • लैंगिक अत्याचारग्रस्त महिलांना कमीत कमी 2 लाख रुपये आणि जास्तीत जास्त 3 लाख रुपयांची मदतही मिळणार
  • वैद्यकीय, कायदेशीर मदत आणि समुपदेशन
  • अ‍ॅसिड हल्ला झालेल्या महिलांनाही मदत
  • अ‍ॅसिड हल्ला झालेल्या महिलांना आधी 75% रक्कम मिळणार
  • उर्वरित 25% रक्कम फिक्स डिपॉझिटमध्ये जमा केली जाणार
  • लैंगिक अत्याचार झालेल्या महिलेला 25% रक्कम तातडीनं दिली जाणार
  • उर्वरित 75% रक्कम फिक्स डिपॉझिटमध्ये जमा केली जाणार
  • या योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर एक समिती स्थापन करणार, ज्याचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असतील
  • योजनेसाठी 68 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद

पण सर्व पीडित महिलांना या योजनेचा लाभ मिळावा असा इशारा कायदेतज्ज्ञांनी दिलाय. राज्य सरकारनं केलेला कायदा कागदावर तरी उत्तम दिसतोय. पण जिल्हा स्तरावर याची अंमलबजावणी तितक्याच प्रभावीपणे होण्याची गरज आहे.

close